आमच्या विषयी
चित्पावन फडके मंडळींचे संघटन करून एकमेकांतील स्नेहभाव वाढवावा व त्यातूनच समाजोपयोगी विधायक व हितकर कार्यक्रम राबवावेत या विचारांनी प्रेरित होऊन फडके कुलातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी वर्षप्रतिपदेच्या सुमुहुर्तावर दि. 27 मार्च 1990 रोजी ''फडके स्नेहवर्धिनी" या संस्थेची स्थापना केली. व प्रचलित कायद्यानुसार संस्थेची ऑक्टोबर / नोव्हेंबर 1995 मधे नोंदणी झाली. व त्यानंतर 'नियम व नियमावली" तयार करण्यात आली.
संस्थेचे ध्येय व उद्देश :-
1) चित्पावन फडके कुलातील मंडळींचे संघटन व सनेहसंवर्धन करणे.
2) चित्पावन फडके कुलातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उन्न्ती करण्यास सहाय्य करणे.
3) फडके कुलवृत्तांतातील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी यथाशक्ती मदत करणे.
यासाठी फडके स्नेहवर्धिनीतर्फे पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
1) कोजागिरी पौर्णिमेच्या सुमारास होणार्या कार्यक्रमात हुशार विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येतो. तसेच गुणवंत युवा कलाकारांचे कौतुक करण्यात येते. त्यांना रोख रक्कमा व स्मृतिचिन्ह देण्यात येते.
2) डिसेंबर/जानेवारी मध्ये होणार्या स्नेहसंमेलन प्रसंगी अमृतवयीन फडकेकुलीन व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. तसेच उल्लेखनीय कमगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो. त्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात येते. यावेळी गायन, वाद्यवादन, कथाकथन असे मनोरंजनाचे कार्यक्रम पण आयोजित केले जातात.
3) गरजू विध्यार्थी, विद्यार्थीनींना शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते.
4) फडकेकुलीन विद्यार्थ्यानसाठी प्रसंगोपात मार्गदर्शनपर मेळावे घेण्यात येतात.
5) जून/जुलैमध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात येते.
6) आद्य क्रंतिकारक वासुदेव बळवंत फडके यंची जयंती 4 नोव्हेंबर रोजी व पुण्यतिथी 17 फेब्रुवारी रोजी सजरी केली जाते. पुण्यात संगम पुलापाशी गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रांगणात, वासुदेव बळवंत यंचा अर्धपुतळा व तेथील गुहेत त्यांच्या जीवनातील प्रसंगावर भित्तिशिल्पे बसविली आहेत. हे काम फडके स्नेहवर्धिनीने सर्व समाजाच्या सहभागाने पार पाडले.
7) राष्ट्रीय पातळीवरील आवाहनानुसार कारगिल निधी भूकंपग्रस्त सहाय्य निधी असे निधी वेळ्प्रसंगी जमा केले जातात व योग्य ठिकाणी पाठवले जातात.
सभासद संख्या -
सभासदांच्या चार श्रेनी असून सदस्य संख्या खालीलप्रमाणे आहे.
1) सन्मानीय सभासद :
2) आश्रयदाता सभासद :
3) आजीव सभासद :
4) साधारण सभासद :
एकूण संख्या -
सभासद शुल्क :- चित्पावन फडके कुलातील व्यक्ती व फडके कुलातील माहेरवाशीणी यांना सभासद होता येते. सभासदत्वाची वर्गनी खालीलप्रमाणे आहे.
अ) आश्रयदाता सभासद :- एकदाच रू. 1500/-
ब) आजीव सभासद :- एकदाच रु. 500/-
क) साधारण सभासद :- दरवर्षी रू. 100/-
नवीन सभासदत्वाचे आवेदनपत्र स्वीकारताना आजीव सदस्य व्हावे असे आवहन केलेल जाते.
कार्यकारी मंडळ :- संस्थेच्या दैनंदिन कारभारासाठी 11 सभासदंची निवड दर तीन वर्षांनी निवड्णुकीने केली जाते. कार्यकारी मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यवाह, सहकार्यवाह व कोषधिकारी हे पाच पदाधिकारी व सहा सभासद असतात. कार्यकारी मंडळाच्या सभा दरमहा घेतल्या जातात.
संस्थेच्या आर्थिक बाबी :-
आश्रयदाता व आजीव सभासद यांच्या शुल्कांच्या रक्कमा मुदत ठेवीत ठेवल्या जातात व त्यावरील व्याजातून खर्च केला जातो. संस्थेचा कायम निधी रू.लाखावर झाला आहे. विद्यार्थ्यांना अर्थसहय्य करण्यासाठी स्वतंत्र निधी असून त्यावरील फ्क्त व्याजाची रक्कम सहाय्यार्थ दिली जाते. दरवर्षी संस्थेच्या जमा खर्चाचे लेखापरीक्षण सनदी लेखापालाक्डून करण्यात येते. संस्थेची वास्तु असावी म्हणून इमारतनिधी सुरू केला असून त्यावरील व्याज न वापरता परत ठेवीत तो गुंतवला जातो.
2007 सालचे पुण्यात झालेले चित्पावन महासंमेलन 23 डिसेंबर रोजी चित्पावन महासंमेलनंतर्गत फडके कुलीनांचे संमेलन आयोजित करण्यात फडके स्नेहवर्धिनीने पुढाकार घेतला होता व त्यावेळी जवळजवळ 625 फडके कुलबंधु भारताच्या वेगवेगळ्या भागातून आलेले होते.